Monday, 27 March 2017

आपल्या मोबाइलला laptop चा wifi speaker बनवा (अगदी मोफत)

नमस्कार मित्रांनो,

आज आपण अश्या softwaer ची माहीती घेणार आहोत कि ज्याचा वापर करुन आपली wireless speaker/ wireless sound याविषयी असणा-या समस्या दुर होनार आहे.

वर्गात आपल्या laptop चा आवाज कमी प्रमाणात वाटत असेल तर आपण त्याला external speaker जोडतो त्याला होनारा खर्च.

laptop चा speaker खराब झाला असेल तर मग त्यात असनारी गाणे किंवा व्हिडिओ कसे एकायचे ....

यासाठी फक्त खालील कृती करा.
१) laptop/ computer मध्ये *soundwire service* he software download करुन घ्या.
२) mobile मध्ये पन हेच app download करुन घ्या.
३) mobile hotspot ने laptop ला connect करा.
४) App ओपेन करा connect करा.
आणि वापरा.

धन्यवाद....

Saturday, 25 March 2017

शालासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्यासाठी शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी

शालासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी                                    शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी

क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.

क्षेत्र -२

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .

क्षेत्र -३

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास

१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.

क्षेत्र -४

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन

१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .

क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.

क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .

खालील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टी ने तयारी करावी

Thursday, 23 March 2017

Educational Apps


*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम*
अंतर्गत मोबाइल डिजीटल शाळांना वाव मिळाला, पाहता पाहता हजारो शाळा मोबाइल डिजीटल झाल्या…

परंतू मोबाइल हे केवळ व्हिडीओ व चित्र पाहण्यापुरते मर्यादित नसून याद्वारे असंख्य शैक्षणिक अँप्‍स चा मनमुराद आनंद आम्ही विद्यार्थ्यांना मिळवून देवू शकतो, फक्त गरज आहे ते अँप्‍स माहीत होण्याची.

केवळ मी काही अँप्सची यादी देतो म्हटलं तर हजारो अँप्सची यादी आपल्याला गूगल बाबाच्या सहाय्याने देता येईल, परंतू ते अँप्‍स किती प्रभावी व परिणाम कारक हे तेव्हाच सांगता येईल जेव्हा मी ते अँप्‍स वापरलेले असणार…

आणि  म्हणून ही यादी..

1. Kidsmath
गणित प्रक्रिया बालकांकरीता उपयुक्त
2. Barakhadi 2.0
बाराखडी साधे शब्द 
3. Animal ABC 
4. eschool4scratch 
खेळातून मनोरंजन, शब्दसंपत्तीत वाढ 
5. Animal 4D 
आभासी प्रतिमा दाखवणे 
6. Hello English 
इंग्रजी सराव करीता उपयुक्त 
7. Attendance taker 
विद्यार्थी हजेरी 
8. Anatomy 4D 
मानवी शरीर अंतर्बाह्य रचना 
9. Space4D 
अंतराळ अभ्यास 
10. Marathi kids 
धुळपाटी सारखा वापर, वर्णमाला, अंकओळख, गणित, भाषा वापर 
11. 50marathistories 
50 छान छान गोष्टी आहेत
12. Android Balwaadi 
मराठी, इंग्रजी वाचन लेखन 
13. Writings ABC 123
इंग्रजी मुळाक्षरे कसे लिहावे 
14. Kings of Math 
वर्ग ५ चे गणित 
15. Jay Maharashtra 
थोर व्यक्तींची माहीती 
16. Numbers 
अप्रगत मुलांसाठी 
17. Kinemaster 
व्हिडिओ बनवू शकतो
18. How to make origami
कागदापासून वस्तू कशा तयार कराव्यात याचे चलचित्र 
19. Google Maps
एखाद्या ठिकाणचा नकाशा पाहणे 
20. Kids paint 
विद्यार्थ्यांकरीता ड्राईंग 
21. Educational Games 
एकत्रित मनोरंजन खेळ 
22. Google Earth 
गूगल मॅपला सबस्टिट्यूट 
23. Solar system 
सर्व प्लॅनेट विषयी माहिती देता येते
24. Quiz maker 
ऑफलाइन टेस्ट बनविणारे apps 
25. Tricks for GK 
प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्यासाठी tricks
26. Anmol goshti 
बालकांकरीता कथा 
27. Marathi dictionary 
समानार्थी शब्द 
28. English Marathi Dictionary 
इंग्रजी मराठी शब्द 
29. Khagol vishw 
भूगोल teaching साठी उपयुक्त 
30. ezpschool 
पाठपुस्तक pdf दाखवणे 
31. Google translation 
कोणत्याही भाषेतून भाषांतर 
32. Foxit pdf 
पुस्तकांसोबत interactions 
33. Starchart 
अवकाश अभ्यासासाठी उपयुक्त 
34. Gurukul study
इ 1 ली ते 8 वी अभ्यासक्रमातील प्रश्न
35. Gom gr 
शासन निर्णय 
36. TeamViewer 
37. Mirrorop 
38. Share it 
39. Mobizen 
40. Airdroid 
हे सर्व apps स्क्रिन कास्ट करीता 
41. Google Googles 
चित्र वरुन searching करा 
42. Skype 
व्हिडिओ कॉल अत्युत्तम 2G वर पण 
शैक्षणिक 
43. Math tips and tricks 
गणितातील क्लृप्त्या 
44. Vedik Math 
45. Xallaps multiplication 
46. – – Addition 
47. – – greater than less than 
48. Math formulae 
49. Clock learning 
50.eduDroid
51. amazing india in hindi
52. shivaji & Maratha empire
53. ABC handwriting free
54. kid science : biology 
55. Fun with Dots – kids learning
56. 35 pictures stories for kids
57. my class shedules
58. sky guide for kids
59. olympaid quiz
60.  Nasa app
61. Chota bheem
62. Indian currancy game 
63. math challenge 
64. science game for kids
65. kelvin
66. kids gk test
67. science experiment with water 
68. Abacus
69. Match and spell 
70. Animal planet 
71. Brain Trainer special
72.English conversation 
73.Lanets space facts 
74.Fun easy learn english
75.Evo memo 
76.1St std marathi 
77. Cursive lite
78. Fun do science 
79. colourful vitamins
80. hindi writing
81. Junior science master
82. Creative kids
83.marathi mulalshare 
84. Kids craft ideas 
85. kidzoo 
86. kids experiments
87.sage kids
88. kids encyclopedia 
89. forts of maharashtra
90. Tux4kids 
गणिताचा सराव 
91. Hello English
नविन शब्दांचे उपयोजन सोदाहरण 
92. Qr droid
Q R code ला scan करणेकरीता, अभ्यासक्रम पुस्तके या qr कोड सह आलेली आहेत. 
93. Picsart 
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग 
94. Blendcollage
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग 
95. Way 2 SMS 
फ्रि SMS जगभर 
96. Paytm 
डेबिट कार्ड वरुन रिचार्ज 
97. Vidmate 
98. Tubemate 
यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोडर 
99. Kingsoft office 
100. Office suit 
Ms office चा वापर 
101. Marathi Greetings 
शुभेच्छापत्र बनविणे 
102. Passportpics 
पासपोर्ट बनविणे 
103. Lumosity 
बुद्धि ला खुराक 
104. Flowers color 
106. Flash card for kids 
107. Gadwat 
किल्ले 
108. Khara mitr 
109. Varnmala lite 

110. Kids doodle 
111. Zebra paint 
113. Pratiyogita mantra 
114. Table 
115. Flute 
116. Piano 
117. Dumpster app 
मोबाइल चे recycle bin 
118. Google Drive 
मोफत १५ जीबी 
119. Text fairy 
फोटोवरचा मजकूर कॉपी करा 
120. Sidebook 
आकर्षक PDF reader 
121. Grade stalk 
ऑनलाइन अध्ययन 
122. Apps backup & restore 
123. Android tutorial 
124. S2G Excel 
एक्सल मराठीत शिका 
125. Telegami 
अँनिमेशन व्हिडीओ
126. Varshik Niyojan

....

👍👍👍👍💐💐💐💐

Monday, 20 March 2017

Technical tips


बंद लॅपटॉपवर मोबाईल चार्ज करा

अनेक वेळा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी अडचणी येतात, तुम्ही शहरापासून दूर आहात, जेथे चार्जिंगची सोय नाही, किंवा तुमच्याकडे चार्जर नसेल तर फोन चार्जिंग करण्यास अडचणी येतात.लॅपटॉप सुरू करून तुम्ही फोन चार्ज केल्यास, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जलद गतीने डिस्चार्ज होते. मात्र एक पर्याय असा देखील आहे की, जर तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही त्याच्या मदतीने तुमचा फोन तुम्ही चार्ज करू शकतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरी लवकर संपणार नाही आणि तुमच्या फोनची बॅटरीही चार्ज होणार आहे.
विंडोज सेव्हन किंवा त्यानंतरच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या कम्प्युटरवर 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा, आणि त्यानंतर 'प्रॉपर्टीज'मध्ये जाऊन 'डिव्हाईस  मॅनेजर' निवडा, त्यावर क्लिक करा.

यानंतर युनिव्हर्सल सीरियल बस कंट्रोलर दिसेल, यावर क्लिक करून यूएसबी रूट हब लिहिलेलं दिसेल. यूएसबी रूट हबच्या प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावर मॅनेजमेंट टॅब दिसेल, यावर अलाऊ कम्प्युटर टू टर्न ऑफ थिस डिव्हाइस टू सेव्ह पावर लिहिलेलं दिसेल. यासोबतच्या बॉक्सवरील टिक मार्क काढून टाका.
यानंतर तुम्ही लॅपटॉप मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरा, तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही तुमची मोबाईल बॅटरी चार्ज होईल.
यानुसार वीज बंद असल्यावरही तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकतात. मात्र या गोष्टीकडे लक्ष द्या की, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कमीत कमी वापरून तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकतात.

Computer slow चालत असल्यास?
तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?
 

बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.

कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.

कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.

१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.

Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.

२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन'  [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.

३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.

- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.

या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

४) कॉम्प्युटर सुरु होताना इतर बरेच अनावश्यक प्रोग्राम सुरु होतात. असे अनेक अनावश्यक प्रोग्राम कॉम्प्युटर सुरु होताना चालू होतात जे चालू जरी नाही झालेत तरी काहीच फरक पडत नाही. परंतु ते सुरवातीला चालू होत असल्याने आपला कॉम्प्युटर स्लो होतो. अशा अनावश्यक चालू होणाऱ्या प्रोग्राम्सना सुरु होण्यापासून थांबवण्यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे करावे.

- Start - Run वर क्लिक करावे. आता Msconfig टाईप करुन 'OK' करावे त्यामूळे स्क्रिनवर System Configuration Utility असा प्रोग्राम चालू होईल.

या प्रोग्राममध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता सरळ 'Startup' ह्या विभागावर क्लिक करावे. इथे 'Startup Item' या नावाखाली तुम्हाला काही नावांची मोठी यादी [ List ] दिसेल व त्याच्या पूढे [ ] असे बरोबरचे चिन्ह असेल, त्या यादीतील सर्व [ ] असे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करुन ते बंद करावे. नंतर 'Apply' व नंतर 'Close' बटनावर क्लिक करावे. या नंतर कॉम्प्युटर 'Restart' चा मेसेज देईल व कॉम्प्युटर एकदा बंद होऊन पुन्हा सुरु होईल. यामुळे अनावश्यक असलेले बरेच प्रोग्राम कॉम्प्युटर दरवेळेस सुरु करणार नाही.

५) सध्या इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवर कॉम्प्युटरचा तसेच इंटरनेटचा वेग वाढविणारे अनेक प्रोग्राम मोफत मिळतात. परंतू त्यातील नक्की कुठला प्रोग्राम चांगला हे ओळखणे कठीण असते, कारण चांगल्या नावाने हानिकारक प्रोग्राम देखिल मिळू शकतात, याला पर्याय म्हणजे नविन एखादा प्रोग्राम पडताळण्यापेक्ष्या जास्त वापरला जाणारा आणि अनेकांनी सुचविलेलाच प्रोग्राम वापरणे योग्य. सध्या ' CCleaner ' हा जास्त ओळखला जातो, याचे कारण म्हणजे तो इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स या ब्राऊझरच्या तात्पुरत्या नको असलेल्या फाईल्स डिलिट करतो, विंडोज मधिल अनावश्यक फाईल्स, लॉग फाईल्स डिलिट करतो, सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटरमधल्या नोंदी व्यवस्थित करतो तसेच तो १००% हानिकारक नाही.

नेटवर्क नसतानाही करा कॉल
मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकवेळा महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत. पण आता यावरही तोडगा निघाला आहे. मोबाईलचं नेटवर्क नसतानाही आता तुम्हाला फोन करता शक्य होणार आहे.
लिबोन ऍपच्या माध्यमातून तुमची ही समस्या दूर होऊ शकते. या ऍपचनं नवीन फिचर रिच मी मुळे तुम्ही नेटवर्कमध्ये नसतानाही कॉल करु शकता, इतकच नाही तर या ऍपमुळे तुम्हाला कॉल रिसिव्ह करणं ही शक्य होणार आहे.
वायफायच्या मदतीनं याचा वापर करता येणार आहे. तुमचं वायफाय ऑन असल्यास फोनमध्ये नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करु शकता. हे सगळे कॉल तुमच्या मोबाईल नंबरवरुनच जातील.
लिबन ऍपवरुन कॉल करण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लिबन ऍप असायची गरज नाही. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या 100 देशांमध्ये कॉल करु शकता. 

पेन ड्राइव ला (RAM) रँम बनवा.
पेनड्राइव को बना सकते हैं रैम. आज मैं आपके लिए एक
ऐसी जानकारी लेकर आया हूं जिसको जानकर
आपकी खुशी का ठिकाना नहीं रहेगा। ये एक
ऐसी जानकारी है जिसका नॉलेज बहुतही कम
लोगों कोहोता है। क्या आपको पता है कि जनरल उपयोग में
आने वाले Pendrive को कम्प्यूटर में RAM (flash drive) की तरह
उपयोग में लिया जा सकता है। ये
तो आपको पता ही होगा कि कम्प्यूटर की स्पीड सबसे
ज्यादाउसमें लगाई जाने वाली RAM की क्षमता पर निर्भर
करती है यदि हमारे कम्प्यूटर में RAM की साइज बहुत ही कम है
तोहमारा कम्प्यूटर धीरे चलेगा। ऐसी स्थिति में यदि हम
एक्स्ट्रा RAM खरीदेंगे तो कम से कम 1000 से1500 रूपये तक
खर्च हो जाएंगे लकिन अगर आप अपने Pendrive को RAM
बनाना जानते हो तो आपका ये काम बहुत आसान
हो जाएगा।आओ जानते है कि कैसे बनाया जाता है पेनड्राइव
को रेम

 1. सबसे पहले अपने Computer के USBपोर्ट में अपनी pen
drive लगाइये ! (पेनड्राइव कम से कम 2
जीबी का होतो अच्छा रहेगा)
 2. अब MyComputer के आइकन
पर जाकरRight click कीजिये। और Properties विकल्प पर
क्लिक कीजिये।
 3. एक विण्डो ओपन होगी इसमें Advanced
System Settings पर क्लिक करें। (यदि आप विण्डोज xp यूज
करते हैं तो Advanced tab पर क्लिककरनाहोगा)
 4. अब Advance Tab पर क्लिक कर Settings बटन पर क्लिक कीजिये।
5. Performance Option विण्डो खुलेगी जिसमेंAdvanced tab
पर क्लिक कीजिये। और Virtual memory केअन्दर दिये गए
Change बटन पर क्लिक कीजिये।
 6. तब एक
विण्डो खुलेगी जिसमें Automatically manage paging file
size for all drives पर टिक (चैकमार्क) अगरलग रहा हो तो इसे
हटा दीजिये। अब अपनी pendrive को दी गयी लिस्ट मेंसे
सलैक्ट कीजिये। (जैसे कि मैंने अपनी पैनड्राइव को चुना है) अब
custom size पर क्लिक कीजियेऔर वैल्यू दीजिए
जो कि आपकी pendrive के खाली स्पेस के अनुसार दे सकते
हो।अब सैट बटन पर क्लिक करके ओके बटन पर क्लिक करें।
आपको एक मैसेज प्राप्त होगा जिसमें ओके पर क्लिक करें।अब
एक मैसेज और प्रस्तुत होगा जिसमें RestartNow बटन पर क्लिक
करें।।।अब आपका कम्प्यूटर जब पुन: चालू
होगा तो आपका पेनड्राइव रेम की तरह काम करेगा और
सिस्टम की स्पीड में बहुत ज्यादा फर्क देखने को मिलेगा।
Note -ध्यान रहे कम्प्यूटर जब रिस्टार्ट
हो रहा हो तो पेनड्राइव कम्प्यूटर में लगा हुआ होना जरूरी है।

अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय

 हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त तापत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. 
१. जर तुमचा फोन चार्जिंगदरम्यान गरम होत असेल तर दुसरा चार्जर वापरुन पाहा. एवढेच नव्हे तर ज्या पॉवर सर्किटमध्ये तुम्ही चार्जर लावताय तोही बदला. अनेकदा बॅटरी जुनी झाल्यानेही फोन गरम होण्याची समस्या होऊ शकते
२. फोन जुना झाल्यास आणि कोणत्याही फीचरचा वापर करताना तो गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेअर अपडेटवर नजर मारा. अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न केल्याने फोन गरम होऊ शकतो. 
३. गेम खेळताना मोबाईल फोन गरम होत असेल तर ओव्हरलोड होतोय असे समजा. अर्थात मोबाईलमध्ये एकाचवेळी अनेक फंक्शन सुरु आहेत. त्यामुळे नको असेलले अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन बंद करा
४. नुसता ठेवल्यावरही फोन गरम होत असले तर त्याचे कारण ओव्हरलोड असू शकते. तुम्ही बॅटरीला ऑप्टिमाईज करु शकता. हा ऑप्शन सेटिंगमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही पाहू शकता कोणते अॅप्लिकेशन बॅटरीचा जास्त वापर करतेय. 
५. ब्राऊजिंगदरम्यान जर फोन गरम होत असेल तर ब्राऊजरच्या सेटिंगमध्ये जाऊन कंप्रेस डाटा अॅक्टिवेट करा. यामुळे केवळ तुमचा डेटाच कमी खर्च होणार नाही तर फोन गरम होणेही कमी होईल. 

६. कॉलिंगदरम्यान तुमचा फोन गरम होत असेल तर एकदा फोनची फॅक्ट्री डाटा रिसेट करा. सेटिंगमध्ये जाऊन बॅकअप अँड रिसेट या ऑप्शनमध्ये फॅक्ट्री डाटा रिसेट करता येईल. 
७. फोनच्या इंटरनल मेमरीमुळे कधी कधी फोन अधिक गरम होतो. त्यामुळे नको असलेल्या फाईल डिलीट करुन मेमरी कमी करा. 


सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरा
मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये सध्या व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. पहावे तिथे नेटकरी व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅप चालू कऱण्यासाठी सिम कार्ड असणे गरजेचे होते. मात्र आता त्याचीही गरज नाही. तुम्ही कुठेही सिम कार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालू करु शकता. 
ही आहे प्रोसेस
अँड्रॉईड टॅबचा वायफाय सुरु करा
गुगल प्ले स्टोरमधून Whatsapp डाऊनलोड करा
टॅब अथवा पीसीमध्ये ज्या नंबरवर व्हॉट्सअॅप हवाय तो नंबर तिथे डायल करा
एसएमएस व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर मेसेज येईव
व्हेरिफिकेशन कोडची नोंद केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप चालू होईल.

 
-
Android फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..
आज आपण एका जबरदस्त app ची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला तुमचा फोन / टॅब्लेट चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास शोधण्यात मदत करेल .....  
अॅन्ड्रॉइड  डिवाइस मॅनेजर फीचर्स ::

● तुमच्या गूगल अकाऊंटने जोडलेले सर्व Android डिवाइस (मोबाइल, टॅब्लेट)शोधू शकता   
● तुमच्या फोनचा Screen Unlock Pattern बदलू शकता तेही फोन प्रत्यक्ष हातात नसताना 
● तुमच्या फोनवरील डाटा चोराच्या हाती लागू नये म्हणून सर्व डाटा पुसून टाकू शकता(Erase)   
● तुमच्या फोनला ठराविक ठिकाणी शोधल्यानंतर नेमका कोणाकडे आहे हे समजण्यासाठी तुमच्या फोन Ring Full वॉल्यूम मध्ये वाजवू शकता तेही फोन हातात नसताना 
● असाही एक पर्याय आहे ज्यात चोराला तुम्हाला फोन करण्यावाचून उपायच सापडणार नाही Call Me नावाच्या पर्यायाचा वापर करताच चोराला फोन वापरता येणार नाही व शेवटी त्याला आपणास कॉल करावाच लागणार
अॅन्ड्रॉइड  डिवाइस मॅनेजर सुरू करण्यासाठी  ::
Android Device Manager वापरण्याआधी तुम्हाला ते तुमच्या फोनवर सुरू  (enable) करावे लागेल आणि त्याला तुमच्या गूगल अकाऊंटला जोडावे लागेल. मात्र ह्या App साठी फोनमध्ये इंटरनेट सुरू असायला हवे.   
आणि हे app स्वतः गूगलने डेवलप केलेलं असल्यामुळे ह्याच्या इतका अचूक रिजल्ट दुसर्‍या कोणत्याही app मध्ये मिळणार नाही व दुसर्‍या कोणत्याही एकस्ट्रा app ची गरजही पडणार नाही 
Android Device Managerतुमच्या फोन अथवा कोणत्याही अॅन्ड्रॉइड डिवाइसवरती सुरू करण्यासाठी खालील सुचनांनुसार सेटिंग्स करा. 

तुमच्या डिवाइस च्या App Menu मधून गूगल सेटिंग्स उघडा   .


त्यात Android Device Manager निवडा


तुम्हाला खालील पर्याय दिसतील ज्यातील ज्याची तुम्हाला गरज आहे ते पर्याय तुम्ही निवडू शकता :


Remotely locate this device ::  तुम्ही Android Device manager तुमच्या डिवाइसची लोकेशन पहाण्यासाठी वापरू शकता. त्यासाठी ह्या ऑप्शन समोर असलेल्या बॉक्सवर टिक करा 
For devices running 4.1 and higher: Location access सुद्धा सुरू असलेला हवा. तो सुरू करण्यासाठी, 
Google Settings > Location आणि  “Location” समोरील बटन सुरू करा. 
Allow remote lock and factory reset :: तुम्ही Android Device Manager तुमच्या डिवाइसला रीमोटली लॉक करण्यासाठी वापरू शकता जेजेकरून तुमचं फोन हरवल्यास त्यातील महत्वाचा डाटा कोणाच्या हाती लागू नये. ह्या पर्यायाने तुम्ही डिवाइस लॉक करू शकता, त्यातील डाटा पुसून टाकू शकता, Screen Unlock Pattern सुद्धा बदलू शकता. त्यासाठी Allow Remote Lock and factory reset ऑप्शन वर टिक करा आणि त्याला ऑन करा. 
 ज्यावेळी  “Activate device administrator” स्क्रीन डिस्प्ले होईल,तेव्हा स्क्रीनवरील सूचना वाचून Android  device administrator अॅक्टिवेट करा.
तुमचा फोन ट्रॅक करण्यासाठी, लॉक करण्यासाठी, डाटा इरेज करण्यासाठी, पासवर्ड बदलण्यासाठी किंवा त्या फोनल तुम्हाला कॉल कर म्हणून सांगण्यासाठी खालील २ पर्याय आहेत ज्यासाठी तुम्हाला तुमच्या गूगल अकाऊंटची गरज पडेल.   

Android Device Manager on Web : वेबसाइट वरून कम्प्युटर वापरुन 


Android Device Manager on Android App on Play Store : हे app वापरुन तुम्ही मित्राच्या फोनवरून तुमचा फोन ट्रॅक करू शकता मात्र तुमच्या गूगल अकाऊंटवरूनच . 


वेबसाइटच्या माध्यमातून ट्रॅक करण्यासाठी ह्या वेबसाइट वर जा 

लिंक - www.google.com/android/devicemanager


तिथे गूगल अकाऊंटने लॉगिन करून तुम्ही अगदी सहज तुमचा हरवलेला फोन लोकेट करू शकाल 
आणि दुसरी पद्धत जिच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मित्राच्या फोनवर app इंस्टॉल करा 

लिंक - Android Device Manager - Play Store Download 


ह्या App च्या सोबत तुमच्या गूगल अकाऊंटने लॉगिन करून त्या सर्व गोष्टी करता येतील ज्या तुम्ही Android Device Manager च्या वेबसाइटवरून करू शकता. 
सारांश तुमचं android डिवाइस हरवण्याच किंवा हरवल्यानंतरच टेंशन नक्कीच कमी झालं असणार. 
हा लेख मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनाही हे App नक्की घ्यायला सांगा जेणेकरून सर्वांनाच मदत होईल त्यांचा हरवलेला फोन शोधण्यात.....   
जर ह्या App ने सुद्धा तुमच्या फोनला शोधण्यात अपयश येत असेल तर तुमच्या फोनचा IMEI क्रमांक जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा तेच तुमची मदत करू शकतील. 

मोबाइलचा unlock pattern विसरलात का ?

मोबाइलचा unlock pattern 

विसरलात का ?

या वेळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत

1) Give Google Account Username and Password

पाच वेळा unlock pattern चा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला येथे एक Forgot pattern चा पर्याय दिसतो. येथे क्लिक करुन तुम्ही तुमचा Gmail  चा username आणि password देऊन ता unlock pattern reset करु शकतात. पण जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर खालील शेवटचा पर्याय शिल्लक राहतो.

2) Factory 

जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर तर तुम्हाला तुमचा मोबाईल Factory reset करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. पण त्याने मोबाईल मधील सर्व डाटा नष्ट होईल, कॉन्टॅक्टस्सुध्दा.

Factory reset करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात

मोबाईल बंद करावा.

Volume UP+Home+Power बटन्स एकाच वेळी प्रेस करावे. (For HTC One: VolumeDown+Power, For Google Nexus 4: VolumeDown+Power)


आता Recovery mode आलेला दिसेल.येथे Volume key चा वापर करुन “Wipe Data/ Factory Reset” हा पर्याय सिलेक्ट करावा.


Conformation झाल्यानंतर मोबाईल factory reset होऊन restart होतो.


आता तुम्ही परत unlock pattern सेट करु शकता.

मोबाईलचा शोध कसा घ्यावा ?

मोबाइल कोठे ठेवला आहे हे आता तुम्हाला आठवत नाही? गाडी च्या शीटखाली, सोफा आणि उशिच्या खाली सुदधा शोधून झाला? ठिक आहे! आता गुगल तुमचा फोन शोधण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला तुमचा कॉम्प्यूटर कोठे आहे हे आठवत असेल तर पीसीच्या डेस्कटॉपवरून अॅण्ड्रॉइड फोनचा शोध घेण्यासाठी गुगलला विचारू शकता.

यासाठी फक्त गूगलच्या सर्च मध्ये  'find my phone' टाइप करा आणि सेकंदामध्ये गूगल तुमचा फोन कोणत्या ठिकाणी आहे हे गूगल मॅपवर दाखवेल. तसेच येथे फोनची रिंग वाजविण्याची, फोनला लॉक करण्याची आणि फोनवरील डेटा नष्ट करण्याची सुविधा देखील आहे.पण तुमच्या फोन मध्ये लेटेस्ट गूगल अॅप जरूरी आहे, जीपीएस सुरू असणे आवश्यक आहे आणि फोन मध्ये ज्या जीमेल अकाउंट आहे त्याच यझर आडीचा वापर करून येथे आधि लॉगीन करणे आवश्यक आहे.